पुसद येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रमत धम्मयान मराठी २०२०या दिनदर्शिकेचे वितरण

26

🔹भारतीय बौद्ध महासभा पुसद व पारमिता महिला मंडळ महावीर नगर यांचा पुढाकार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.13डिसेंबर):-दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद व पारमिता महिला मंडळ महावीर नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भिमराव आंबेडकर यांची १०८ वी जयंती स्थानीय पारमिता बुद्ध विहार महावीर नगर येथे साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन धुळधज हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून बौद्धाचार्य तुकाराम चौरे, महावीर महिला शाखाध्यक्षा शांताबाई मंडाले , माजी मुख्याध्यापक प्रल्हाद खडसे हे उपस्थित होते.

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व प. पू .डॉ .बाबासाहेब आंबेडकर आणि भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून व सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्रल्हाद खडसे यांनी केले.यावेळी धम्मयान मराठी २०२० या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.

यावेळी भीम गर्जना मंडळ महावीर नगर ,पारमिता महिला मंडळ , भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसदचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच उपासक -उपासिका उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान खंदारे यांनी केले. तर आभार ज्योती कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.