पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात शिंदखेडा येथे शिवसेनेचे भव्य आंदोलन

33

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.13डिसेंबर):-दि.१२/१२/२०२० रोजी डिझेल पेट्रोल चा भाव विरोधात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने शिवसेना नेते संपर्कप्रमुख श्री बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख श्री हिरालाल अण्णा माळी यांनी धुळे जिल्हा शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढून बीजेपी सरकारचा पुतळा जाळला.

डिझेल पेट्रोलचे भाव कमी व्हायला पाहिजे व शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी शिवसेना धुळे जिल्हा सर्व नेते व पदाधिकारी केंद्र सरकार विरोधात धुळे जिल्हा (ग्रामीण), शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात व भाजपाचे नेते शेतकऱ्यांबद्दल करत असलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल शिवसेनेचे संपर्कप्रमुख मा.श्री बबनराव थोरातसाहेब यांच्या नेतृत्वात शिंदखेडा येथे शिवसेनेच्या वतीने भव्य आंदोलन पुकारण्यात आले आहे.

तरी शिंदखेडा तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना,महिला आघाडी,पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,उपतालुकाप्रमुख,शहरप्रमुख,उपशहरप्रमुख विभागप्रमुख उपविभागप्रमुख,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.