वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकात खंडाईत यांची निवड

29
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.13डिसेंबर):-सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा समनवयक आयु.चंद्रकात खंडाइत याची सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष म्हणून फेर निवड करून संपूर्ण सातारा जिल्ह्याची जबाबदारी एक विश्वासू म्हणून त्याच्या खांद्यावर दिली.

सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगची कार्यकारणी निवडण्याचे किंवा पुनर्रचना करण्याची जबाबदारी खंडाइत यांच्यावर सोपवली आहे.खंडाइत आप्पा यांचेवर साहेबांनी दाखविलेला विश्वास हीच खरी आंबेडकरी चळवळीला दिलेल्या योगदानाची आणि आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ असल्याची पोहोच पावतीच आहे.
आज जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी खंडाइत आप्पाची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी माण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीपन आप्पाची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी माण तालुका सचिव आयु.युवराज भोसले,संतोष घाडगे, आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.