जखमी अवस्थेत असलेल्या सापाला उपचार करून वाचविले

44

🔹घोणस जातीच्या सापाला केले वन विभागाकडे सुपूर्द

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.14डिसेंम्बर):-कोंडवे येथे घोणस जातीचा साप जखमी अवस्थेत असल्याचे समजताच काही व्यक्ती सर्प मित्रांचे सहकार्याने सापाचा जीव वाचविला.सुदैवाने तेथे शाहूपुरी व कोंडवे सर्प मित्र,प्राणी मित्र उपस्थित होते, त्यांनी सर्पास वन खात्याशी संपर्क साधून डॉक्टरांच्या मदतीने तातडीने औषध उपचार सुरु करण्यात आले.रात्री उशिरा ३.०० पर्यंत सरपावर उपचार सुरु होते, त्याच्या नंतर सर्पाला वन विभागाकडे सुपुत करण्यात आले.

या वेळेस तिथे वन्यजीव रक्षक ,प्राणीमित्र ,सर्पमित्र उमेश काळे, ओंकार ढाले, मयूर आडागळे, कुशल रोहिरा, शुभम ओधकर, सचिन सोनवणे, स्वप्नील साळूखे, मृणमई जाधव, मयूर तिखे, करिष्मा चव्हाण व तसेच डॉ. चपणे, सुनील भोईटे सर आणि शितल राठोड मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. या घोणस सापाला थोड्याच दिवसात जंगलात सुखरूप सोडण्यात येईल. घोणस जातीचा सापाचा मिलनाचा काळ सुरू झाला आहे, त्यामुळे घोणस या काळात अग्रेसिव असते.

त्यामुळे आपल्या शक्यतो रात्रीच्या वेळी दिसणारा हा साप दिवसही घराच्या आसपास किंव शेतांमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्तीच्या संख्येने दिसू शकतात. त्यामुळे असे काही निदर्शनास आले तर तात्काळ जवळच्या वन विभागाशी किंवा सर्प मित्राशी संपर्क साधा. हेच विष जर आपल्या शरीरावरील ताज्या जखमेवर उडले तरी मृत्य ओढवू शकतो. त्यामुळे साप मारणे टाळा व सर्पमित्रांना बोलवून साप व तुम्ही स्वतःही सुरक्षित रहा असे आवाहन वन विभागाने केले आहे