नाशिक -तपोवन परिसरात युवतीचा खून करुन फेकला मृतदेह

30

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.14डिसेंबर:)- तपोवनातील रामटेकडी परिसरातील कुजलेल्या अवस्थेत एका अनोळखी युवतीचा मृतदेह आढळून आला आहे या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून रामटेकडी परिसरात फिरण्यास गेलेल्या काही नागरिकांनी कुजलेला मृतदेह आढळला त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली असता १७ते२० वयोगटातील युवतीचा मृतदेह असल्यास स्पष्ट झाले खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही , शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीची माहिती मागविण्यात त्याच्या आधारे पुढील शोध भद्रकाली पोलीस ठाणे करीत आहे