नवी मुंबईच्या ऐश्वर्या कुंचमवारचे सुयश

42

✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931

अहमदनगर(दि.14डिसेंबर):-सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ फार्मसी पनवेल,नवी मुंबई या कॉलेज मधील विद्यार्थीनी ऐश्वर्या अशोक कुंचमवार हिने बी. फार्मसी तिसऱ्या वर्षी 9.93 cgpa गुण मिळवून कॉलेज मधून प्रथम क्रमांक मिळवला आहे ,तसेच मागील दोन वर्षांपासून झालेल्या एकूण सहा सेमिस्टर मध्ये तिने सर्व विद्यार्थ्यांमधून कॉलेज मध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.तिचे हे सलग सहावे विजेतेपद आहे.

यासाठी तिला वडील अशोक कुंचमवार,आई सुचित्रा कुंचमवार, भाऊ आविष्कार कुंचमवार, परिवारातील सदस्य व कॉलेजचे प्राचार्य,प्राध्यापक यांचे अनमोल सहकार्य लाभले, अतिशय मेहनतीने व जिद्दीने कठीण परिश्रम मिळवुन उज्वल यश संपादन केल्याबद्दल व सलग सहा सेमीस्टर मध्ये प्रथम क्रमांकाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब) यांच्यासह शैक्षणिक, सामजिक, साहित्यिक क्षेत्रांतील मान्यवर, समाजबांधव व आप्तेष्ट यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.