आमदार प्रताप सरनाईक यांचे विधानसभा सदस्य पद हटवा

35

🔸तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.14डिसेंबर):-वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा अवमान केलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांचे आमदार पद रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी उमरी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

यावेळी छावाचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष यागेश पाटील मोरे, मराठा मावळा संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष कैलास पाटील कदम, युवा तालुकाध्यक्ष प्रकाश शिनगरवाड, वि.आ. तालुका अध्यक्ष योगेश पाटील शिंदे, संपर्क प्रमुख हानंमंत पाटील जाधव ,राम जाधव, श्रीनिवास शिंदे ,प्रतिक जाधव, कैलास पाटील कवळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.