पावसामुळे झालेल्या हंगामा ते दादर या पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान

27

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.14डिसेंबर):-दि.१२/१२/२०२० रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या रब्बी हंगामातील दादर या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे व अक्षरशः पिके जमीनदोस्त झाली आहेत.बळीराजाचा तोंडाशी आलेला घास निसर्गाने पळवून नेला.तरी सदैव जनतेच्या समस्येविषयी तत्पर असणारे नेते आदरणीय कामराज भाऊसाहेब निकम यांनी प्रशासनाला सुचना करून लगेचच 2 दिवसात स्पॉट पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्याची मागणी आ.जयकुमारजी रावल यांच्या सूचनेनुसार मा. तहसीलदार शिंदखेडा, मा.कृषी अधिकारी शिंदखेडा,यांना केली.

स्पॉट पंचनामे करताना मा.कृषी अधिकारी शिंदखेडा,जि.प.उपाध्यक्ष भाऊसो.कामराज निकम,जि.प.सदस्य बापूसाहेब,भाजपा तालुकाध्यक्ष व जि.प.सदस्य दादासो. पंकज कदम,पं.स.सदस्य भरत मधुकर पवार,गटातील सर्व तलाठी कर्मचारी,विकास पाटील,सरपंच,दभाषी,कमखेडा,हुंबर्डे,दभाषी,वर्षी,वडली,तावखेडा,दत्ताणे,गव्हाणे,दसवेल,अजंदे,येथील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.