शहिद मेजर सुरेश घुगे यांना पुष्प चक्र अर्पण करुन शेवटचा निरोप

34

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.14डिसेंबर):- जिल्ह्यातील मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव(ता.नांदगांव) येथील सुरेश रघुनाथ घुगे(वय-३४)यांना जम्मू-काश्मीर सीमा रेषेवर देशाचे संरक्षण करत असताना या सुपुत्राला वीरमरण आले. आज सोमवारी या जवानावर अस्तगाव या त्यांच्या मूळ गावी दुपारी चार वाजता शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी हजारो नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जम्मू जम्मू काश्मीर मधील नैवशेत सेक्टर येथे गस्तीवर असताना बर्फावरुन पाय घसरून ते खोल दरित पडल्याने मेजर सुरेश घुगे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.त्यांना उपचारासाठी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परंतु रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शुक्रवारी मिळाली होती तब्बल तीन दिवसानंतर मेजर सुरेश घुगे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान पार्थ घरासमोर ठेवल्यानंतर आई-वडील पत्नी यांच्यासह सह नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर विविध मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले तर वीर मरण आलेले सुरेश घुगे यांना त्यांची आठ वर्षाची मुलगी आराध्या नी मुखाग्नि दिली.

यावेळी दिंडोरी लोकसभेच्या खासदार डाॅ भारती पवार तसेंच नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी पुष्प चक्र अपॅण करुन श्रध्दांजली वाहिली तसेच
उपस्थित नातेवाईक अन्न नागरिक शोकसागरात बुडाले होते
शहीद सुरेश घुगे यांचे हे सर्वोच्च बलिदान नांदगावसह देश कधीच विसरू शकणार नाही. आज अतिशय शोकाकुल वातावरणात, आपल्या वीर जवानाला अंतीम निरोप देण्यासाठी जमलेल्या जनसागराने पुष्पवृष्टी करत सुरेश घुगे यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली.शेवटी राष्ट्रगीताने श्रद्धांजली वाहण्यात आली