गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतील त्या अटी रद्द करा

    43

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.14डिसेंबर):- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेती ल वयाशी निगडित ‘त्या’ जाचक अटी रद्द करण्याची मागणी धनगर समाज सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी परभणी जिल्हा कृषी अधीक्षक यांचेकडे निवेदनाद्वारे केली.

    यासंदर्भात त्यांनी नुकतेच गंगाखेड तालुका कृषी अधिकारी मस्के साहेब यांच्यामार्फत परभणी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले .या निवेदनात म्हटले आहे की नैसर्गिक आपत्ती अथवा अपघातात शेतकऱ्याचा अथवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास ते कुटुंब उघड्यावर पडते. त्या कुटुंबास काहीतरी मदत झाली पाहिजे यासाठी शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. पण यातील जाचक अटीमुळे पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजनेत मागील वर्षीपासून शेतकऱ्यासोबत त्याच्या कुटुंबातील एकाचा समावेश करण्यात आला आहे.

    पण यात कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 75 वर्षे वय अशी अट ठेवण्यात आली आहे. दहा वर्षा खालील शेतकऱ्याचे मुलगा अथवा मुलगीचा अपघात झाल्यास या वयाच्या अटीमुळे या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. आजच्या घडीला शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात राहत आहे. शेतात राहत असल्याने त्यांची लहान मुलेही व वृद्ध आई-वडीलही शेतातच राहतात. दहा वर्षाखालील लहान मुले व 75 वर्षावरील वृद्ध आई-वडील सुद्धा शेतकऱ्याला शेती कामात मदत करत असतात. त्यांचे सुद्धा शेतीमध्ये योगदान मोलाचे आहे.

    सोनपेठ तालुक्यातील कानेगाव येथील वीज पडून मृत्युमुखी पडलेला लक्ष्मण गोविंद दुगाणे यांचे वय नऊ वर्षे आहे. या योजनेतील वयाच्या जाचक अटीमुळे लक्ष्मणच्या व ईतर अनेक कुटुंबियांस या योजनेचा लाभ मिळत नसल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. पण दुर्दैवाने अपघात हा वय पाहून घडत नाही तरी. या योजनेतील वयाची अट रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर व पिक विमा चळवळीतील सोनपेठचे कार्यकर्ते विशंभर गोरवे यांनी तालुका कृषी अधिकारी गंगाखेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.