सायंटिस्ट होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा छोटा सायंटिस्ट द्विज सचिन सरतापे

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.14डिसेंबर):-शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विध्यालंय देवापुर,ता.माण,जि. सातारा या शाळेत इयत्ता आठवी वर्गात शिकणारा विध्यार्थी द्विज सचिन सरतापे,रा.म्हसवड,ता.माण,जि. सातारा या छोट्याशा शहरात राहणारा हा विध्यार्थी आज डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात सायंटिस्ट होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा छोटा सायंटिस्ट म्हणून नावारूपाला येऊ लागला आहे. लहान वयातच असताना काहीतरी धडपड करून टेक्नॉंलॉजीने सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास लहानपणापासून त्याच्यात आहे.इयत्ता सातवीत असताना शाळेतील स्पर्धामध्ये ड्रोन बनवून प्रथम क्रमांक मिळवला त्यावेळी त्याचे विशेष कौतुक झाले त्यानंतर तालुका पातळीवर सहभाग नोंदविला ज्यावेळी जिल्हा पातळीवर स्पर्धेला जाताना विशेष मेहनत घेऊन बेटरीवर चालणारा ट्रॅकटर बनवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले त्यावेळी त्याची विशेष दखल घेतली गेली.
आतापर्यत द्विजने ड्रोन ,बेटरीवर चालणारा ट्रॅकटर,जहाज,कार,थर्माकोल प्लास्टिक कटर,फायर गन(जँगली प्राणी पळवून लावायची गण),वायरलेस टेस्टर,सायकलचे मोटारसायकल रूपांतर अशा अनेक प्रकारचे तंत्रज्ञान बनविण्याचा प्रयत्न केला.
तहान भूख हरपून 12-12 तास संशोधन कामात मग्न असणाऱ्या या छोट्या सायंटिस्टला घरातूनच आपल्या आई वडिलांकडून आणि इतर नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात पाठींबा आहे.भविष्यात पाण्यावर चालणारी चार चाकी बनविण्याचा या छोट्या सायटिस्टचा मानस आहे या त्याच्या सर्व कामास शाळेतील शिक्षकाची मदत लाभते