एल आय सी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.15डिसेंबर):/भारतीय आयुर्विमा महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना 1 आगस्ट 2017 पासून देय असलेली सुधारीत वेतनश्रेणी त्वरित लागू करण्यात यावी या प्रमुख मागणी कडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 15 डिसेंबरला आयुर्विमा कर्मचारी अधिकारी व विकास अधिकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एल आय सी चंद्रपूर शाखा क्रमांक 1 समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यात ए आय आय इ ए चे सचिव दीपक गोरख, अध्यक्ष सुधनवा गुमगावकर,महिला प्रतिनिधी आरती दयाल, नीता जोशी, विकास अधिकारी संघटना ,न्याशनल फेडरेशनचे चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष राजकुमार जवादे,सचिव अजय चिवंडे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.