शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवारण सभा घेणे गरजेचे

38

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.15डिसेंबर):-पुरोगामी शिक्षक समिती शाखा चंद्रपूरचे पदाधिका-यांनी प्रलंबित शिक्षकांच्या समस्या संदर्भात नुकतीच जिल्हा परिषद चंद्रपूरच्या शिक्षण सभापती रेखाताई कारेकार यांची भेट घेऊन समस्येचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या समस्या दूर करण्याकरिता जिल्हा परिषद स्तरावर समस्या निवारण सभा घेणे गरजेचे असल्याचे मत पदाधिका-यांनी व्यक्त केले.

शिक्षकांच्या अनेक समस्या रेंगाळत पडल्या आहेत. शिक्षक स्वतःच्या न्याय हक्कासाठी अधिका-यांशी वारंवार चर्चा करतात. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्या जशाच्या तश्या पडून आहेत. यावेळी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या शिक्षण सभापती रेखाताई कारेकार यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी राज्यनेते विजय भोगेकर, जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे, कोषाध्यक्ष दिपक ससेकर, कार्यालयीन सचिव दुष्यंत मत्ते, उपाध्यक्ष सुनील कोहपरे, सरचिटणीस गंगाधर पडोळे, मनोज बेले, सुरेश गिल्लोरकर, विलास सारये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.