सतरा कोटीच्या राजपथ रस्त्यावरील देशमुख काँम्प्लेक्सचे अतिक्रमण निघाले

25

🔹नगरपालीकेची भुमिका स्वागतार्ह, पण इतर बेकायदेशीर बांधकामांचे काय

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.16डिसेंबर):-स्टेशन भाग परिसरात मागील चार वर्षांपासून सतरा कोटीचा बांधण्यात येणारा राजपथ रस्त्यावर अडथळेचे ठरणारे काँम्प्लेक्स, दुकांनाचे आज दुपारपासून अतिक्रमण जेसीबी लावून काढण्यात आले.म्हणून बऱ्याच वर्षानंतर गावाच्या विकासात भर घालणाऱ्या राजपथ रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात असल्याने, लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली व पालिकेने अतिक्रमण बाबत घेतलेल्या भुमिकेचे स्वागत करत, हे दिसणारे अतिक्रमण निघाले.

पण जे बेकायदेशीर नावाजलेल्या लोकांची कोटीची,टोलेजंग व्यापारी गाळे आहेत त्यांचे काय? त्यांना मुबा न देता. तेही अनधिकृत व्यापारी गाळ्यांचे बांधकाम कायदेशीर मार्गाने आताच काढण्यात यावी,अशी मागणी अनेकवेळा अतिक्रमण बाबत तक्रार करणाऱ्या,व अतिक्रमणावर बारीक लक्ष ठेवून असलेल्या गावातील सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

गावात कोणकोणती बांधकामे कायदेशीर आहेत व कोणकोणती बांधकामे बेकायदेशीर, अनधिकृत आहेत, हा नेहमी प्रत्येक सत्तेत चर्चेचा विषय होऊन जातो. म्हणून अज्ञानासोबत सज्ञान व्यक्तीला जरी विचारले, तरी तो गावात कोणाचे बांधकाम बेकायदेशीर, अनधिकृत आहे, हे सहज बोलून दाखवतो. पण ते म्हणतात ना,सत्तेपुढे शहाणपण थोडे, असाच काहीचा प्रकार अनेकवेळा अतिक्रमण बाबत गावात पहायला मिळतो.सत्तेत आल्यावर प्रत्येक व्यक्ती, प्रथम हा माझा आणि हा त्याचा करत असतो.

आपला कार्यकर्ता असला तर सर्व कायदे, संविधान त्याच्यासाठी बाजूला आणि तोच परका दुसऱ्या पडतील,विचारांचा असला तर थोडे जरी चुकला तर सर्वच कायदे, संविधान रातोरात त्याचा विरोधात चालले जातात. म्हणजे त्याची सत्ता न येणे ,हेही खुप मोठे पाप समजले जाते. म्हणून गरिबाने गरिब म्हणून जगणे,हेही शाप असते आणि एखाद्याने एखाद्या गटाची, पक्षाची जास्त वेळ, दिसणारी गुलामगिरी करणे हेही महापाप समजले जाते. म्हणून अनेकदा शिक्षीत, सज्ञान,व्यवसायिक,व्यापारी व्यक्ती राजकारणापासून हायतौबा करत असतो.

शहरात अतिक्रमण बाबत मागे २१जानेवारी २०१२ रोजी न- भुतो,न- भविष्यती असाच बऱ्याच वर्षापासून गाजलेला अतिक्रमणाचा विषय जिल्हाधिकारी श्री दिलीप बंड असल्यावर हाताळण्यात आला. त्यावेळी ह्याच स्टेशन भाग परिसरात म्हणजे आताच्या सतरा कोटीच्या राजपथ रस्त्यावर जवळपास चारशे, साडेचारशे लहानमोठे व्यवसायिक ,आपले व्यवसाय ताटून,कुटूबांचा गाडा चालवत होते.मात्र त्यांचे हे व्यवसाय अनधिकृत, बेकायदेशीर जागेवर असल्याचे काहींनी सिद्ध करत, रातोरात अतिक्रमण काढत,अतिक्रमण काढल्याने गावाच्या विकासात कसा भर होईल,गाव कसे सुंदर, गजबजलेले दिसेल, असे स्वप्न दाखविले. तेव्हा व्यापारी, व्यवसायिक लोकांनी हा आघात सहन ही केला.

ह्या अतिक्रमण काढल्यामुळे कोणाचे आयुष्य तितरबितर झाले, कोणी रस्त्यावर आले,रोडावर व्यवसाय करू लागले,कोणी गाव सोडले तर ज्याच्या जवळ दोन पैसे होते.त्याने मिळेल तिथे ,जादा भावाने दुकान घेत, व्यवसाय पुर्वपदावर ताटण्याचा प्रयत्न केला. पण आजपर्यंत ह्या राजपथ रस्त्याला जिंवत,सुंदर, गजबजलेले स्वरूप आले नाही आहे. कारण मागील सात वर्षांपासून नंदूरबार चौफुली ते गर्ल्स हायस्कूल पर्यंतचा राजपथ रस्त्याचे बांधकाम दैनंदिन सुरूच आहे. एक कोटी पच्यानऊ लाखात डाँ. देशमुख यांच्या सत्तेच्या काळात बसस्टँड ते नंदुरबार चौफुलीपर्यंतच्या रस्त्याचे काम तीन वर्ष सुरू होते व आता मागील चार वर्षांपासून सतरा कोटीच्या निधीची कामे ह्या राजपथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यासाठी चालू आहे. म्हणून हा रस्ता का पुढील वर्षी सत्ता एंडीगपर्यंत लोकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी पुर्ण होईल, असे लोकांमध्ये म्हटले जात आहे.

पण ते काहीही असो,आज दोंडाईचा नगरपालिकेकडून सतरा कोटीचा, शहराच्या विकासात भर घालणाऱ्या राजपथ रस्त्यावर अडथळे ठरणारे काँम्प्लेक्स,दुकानापुढील जे अतिक्रमण काढण्यात आले व मागे प्रोबेशनरी एसपी श्री पंकजजी कुमावत यांना घेऊन रस्त्यावरील हातलाँरी, टपऱ्या काढत रस्ता मोकळा करण्याचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. पण ह्याच रस्त्यावर काही बलाढ्य व्यक्तीचे कोटीचे,टोलेजंग बेकायदेशीर, अनधिकृत व्यापारी संकुल आहेत. त्यांच्याबाबत जागरूक नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी दिल्या आहेत. तरी नगरपालीकेने अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करत काहींना दारू,वाईन शाँपचे परवाने,राष्ट्रीयकुत ,खासगी बँकाकडून कर्ज सुविधा पुरवण्यासाठी ना-हरकत दाखला देवून टाकला आहे.

म्हणजे गरिब, अतिक्रमण जागेवर असला तर त्याला पुर्ण जीवावर उठवायचे आणि श्रीमंत, बलाढ्य असले तर त्याला दारू परवाने,राष्ट्रीयकुत बँकेची कर्जाची सवलत द्यायची,हा कुठला न्याय आहे. म्हणून ह्या सतरा कोटीच्या राजपथ रस्त्यावर आजपर्यंत जो गरिबाला अतिक्रमण बाबत न्याय देण्यात आला,तोच न्याय पुढे बलाढ्य, श्रीमंतालाही देण्यात यावा,तसेच राजपथ रस्ता वेढावाकडा न बनवता सरळ बनवावा,एवढीच रास्त मागणी गावातील अतिक्रमणावर बारीक लक्ष ठेवून असलेली मंडळी नगरपालीकेकडे करत आहे.