दैनिक प्रतिवीरच्या उप-संपादकपदी गोविंद शिनगारे यांची निवड

32

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(नि.16डिसेंबर):- प्रतिवीरचे मुख्य आवृत्तीसंपादक मा. चंद्रशेखर गायकवाड सोलापूर व मुख्य आवृत्ती कार्यकारी संपादक मारुती गवळी यांच्याकडून सोलापूर येथुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून दैनंदिन प्रकाशित होत असलेले व जनसामान्यांचा आवाज म्हणुन नावारुपास आसलेले प्रसिद्ध दैनिक प्रतिवीरची एक विशेष ओळख असुन बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुरू झालेल्या दैनिक प्रतिवीर च्या उपसंपादकपदी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे भूमिपुत्र शैक्षणिक सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात आपली वेगळी ओळख असणारे गोविंद भारत शिनगारे यांची दैनिक प्रतिवीरच्या उप-संपादकपदी नेमणूक करण्यात आली.

त्यांच्या निवडीने जिल्ह्यातील सर्वसामानांच्या प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम या जबाबदारीतून होणार असल्याचे सांगण्यात आले ,त्याचबरोबर बीड जिल्हा उपप्रतिनिधी पदी शैलेश मरळकर यांचीही निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या पत्रकारांचे दैनिक प्रतिवीरचे मुख्य आवृत्तीसंपादक श्री चंद्रशेखर गायकवाड यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.