वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

32

🔸वंचित बहुजन आघाडी ने दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.१७डिसेंबर):-भारत सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सर्व शेतकरी धरणे आंदोलन करत असून त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आज वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

त्याप्रसंगी मराठवाड्याचे अध्यक्ष अशोकभाऊ हिंगे, औरंगाबाद जालना निरिक्षक डॉ.नितीन सोनवणे, बीड जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे व शिवराज बांगर जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर, धमानंद साळवे, अनंतराव सरवदे , संतोष जोगदंड, केज तालुका संघटक विशाल भैय्या धिरे,दिपक धिरे, अजय सरवदे, ज्ञानेश्वर कवठेकर, युनुस शेख, सय्यद सुभान, किरण वाघमारे, संदीप जाधव,लखन जोगदंड,विश्वजित डोगरे,किशोर भोले, पप्पु गायकवाड, बंटी सौदरमल, बाळासाहेब गायकवाड, गोरख झेंड , लखन जोगंदड यांच्यासहीत असंख्य शेतकरी बंधूभगिनींसह वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.