चिमुरात भैय्यासाहेब आंबेडकर जयंती साजरी

32

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.17डिसेंबर):-भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा चिमूरच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब ऊर्फ यशवंत आंबेडकर यांची १०८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लहूजी पाटील, प्रमुख अतिथी गुलाब गणवीर, मार्गदर्शक जनार्धन खोब्रागडे, शंभरकर, रामदास राऊत आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी जनार्धन खोब्रागडे मार्गदर्शनात म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकर यांनी भूमिहीन लोकांकरिता न्याय मिळवून देण्याकरिता सत्याग्रह चालविला. रिपब्लीकन पक्षाच्या एकजुतीकारिता प्रयत्न केला. त्यांनी मुबई येथे चैत्यभूमीची निर्मिती केली. बौद्ध धर्मियांच्या सवलतीसाठी संघर्ष केला. त्यांनी मुंबई ते महू पर्यंत भिमज्योत यात्रा काढली.

कार्यक्रमाचे संचालन सरचिटणीस एन. पी. रामटेके यांनी केले. उपस्थितांचे आभार शालिक थूल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवराम मेश्राम, वासुदेव गायकवाड, श्रीदास राऊत, नारायण कांबळे आदीने अथक परिश्रम घेतले.