भव्य पुस्तक प्रकाशन तथा विविध राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

37

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.17डिसेंबर):-शब्दगंध समुह प्रकाशन तथा ग्रंथमित्र युवा मंडळ औरंगाबाद आयोजित भव्य पुस्तक प्रकाशन तथा विविध राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा(16) रोजी मौलाना आझाद सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता.याला उद्घाटक म्हणून नरूद्दीन मोल्लाजी ,प्रमुख उपस्थितीत सुमित राठोड, अंकुश त्रिभुवन,दामोधर त्रिभुवन, सुशील वाघमारे, योगेश वैष्णव,विजय त्रिभुवन,संजय काळे, सुमनबाई त्रिभुवन,संगीता दाभाडे, भगवान दाभाडे, सदाशिव बागडे,प्रभाकर बर्हे, सुरेश त्रिभुवन, आनंद त्रिभुवन,प्रेमराज त्रिभुवन आदी उपस्थित होते.

तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार सुर्यकांत मोटे, नरूद्दीन मुल्लाजी,सुशील वाघमारे, सुमित राठोड, सुमित पंडीत, गजानन शिरसागर, मारिबा चव्हाण तसेच महात्मा फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार मध्ये संदिप पाटील,मनोज बाचले,दहापुते सर,प्रभाकर बर्हे, विठ्ठल खैरे, सदाशिव बागडे,अंगद सर, तसेच चारूशिला जाधव यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राष्ट्रीय पुरस्कार,श्रीमती कराड रतन अंबादास ,दैवशाला गुरव,भारती देवरे,वंदना चौथे, इत्यादी तसेच उत्कृष्ट साहित्य राष्ट्रीय पुरस्कार विद्या सरपाते, इत्यादी मान्यवरांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम चे आयोजन संदिप दा त्रिभुवन यांनी केले होते.सुत्रसंचलन संदिप भदाणे यांनी केले.संगिता दाभाडे यांनी आभार मानले.