महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत,उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा तर्फे सिकल सेल नियंत्रण सप्ताह

32

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.17डिसेंबर):-दि.११ डिसेंबर ते १७ डिसेंबर या दरम्यान, “सिकल सेल नियंत्रण सप्ताह” साजरा करण्यात आला. या दरम्यान, एकूण २०० रुग्णांची, उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत तपासणी करण्यात आली. यात प्रामुख्याने, गरोदर माता, लहान मुले व वृध्द यांचा समावेश होता. या प्रसंगी, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चन्द्रे यांच्या समवेत डॉ. मनीषा गुजर, डॉ. रचना पाटील, उज्ज्वला मोरे, अजय माळी, धीरज डोडे, योगेश पवार , विजय पाटील, सचिन ठाकूर, अक्षय मराठे,गजेंद्र नेरपगार , खंडेराव ईशी तसेच सर्व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते. सिकल सेल बद्दल, डॉ. ललितकुमार चन्द्रे, यांनी सुरक्षित अंतर नियमन ठेवून, रुग्णांना, सिकल सेल बद्दल थोडक्यात पण अत्यंत महत्वाची माहिती दिली.

डॉ. ललितकुमार चन्द्रे,यांनी सांगीतले की, सामान्य रक्तपेशी वाटोल्या आकाराच्या असतात, सिकल सेल झाल्यावर , त्या विला आकाराच्या होतात. याची लक्षणे अशक्तपणा, सांधेदुखी, सांधे सुजणे, शरीर पिवळे, असह्य वेदना व लहान बालकांना वारंवार जंतू संसर्ग ही आहेत. याची तपासणी, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे मोफत, बोटातून एक थेंब रकत घेवून सोलूबीलिटी चाचणी केली जाते. हि चाचणी पॉजिटिव असल्यास, हीमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस चाचनी केली जाते. लग्न ठरवण्यापूर्वी, मुलगा व मुलगी दोघांचीही सिकल सेल चाचणी, अत्यंत महत्वाची आहे कारण, होणाऱ्या अपत्यास हा आजार होवू शकतो. जर दोघेही वाहक असतील तर, एक वाहक व एक ग्रस्त असेल तर आणि दोघेही ग्रस्त असतील तर. डॉ. ललितकुमार चन्द्रे, यांनी उपचारा संदर्भात, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा तर्फे, सिकल सेल ग्रस्तांना, मोफत फॉलीक असिड गोळ्या, मोफत वेदनाशामक, मोफत प्रतिजैविके, मोफत रक्त संक्रमण तसेच गुंतागुंतीच्या रुग्णांना, त्वरित संदर्भ सेवा पुरविली जाते, असे सांगीतले व सर्वांनी आपल्या आरोग्याचे जतन करावे, हे नम्र अभिवादन केले.