ग्रा.पं. निवडणूकीत वंचित बहुजन अाघाडी करणार साेशल इंजिनिअरींगचा प्रयाेग

30

🔸नियाेजनाचा मागितला अहवाल, अॅड. प्रकाश अांबेडकर यांचा अादेश

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

अंबाजोगाई(दि.17डिसेंबर)मो:-ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अाता निवडणुकीतही साेशल इंजिनिरींगचा प्रयाेग करण्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन अाघाडीने हालचाली सुरु केल्या अाहेत. याबाबत अाघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश अांबेकर यांनी जिल्हाध्यक्ष, व महासचिवांना पत्र पाठविले असून, निवडणूक नियाेजनाचा अहवाल २० डिसेंबर सादर करण्याचा अादेश दिला अाहे.त्यामुळे राजकीय गणितं मांडण्याला अाता गती अाली अाहे.

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला हाेता. तालुक्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. मात्र काेवीड-१९ ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द केला होता. त्यानंतर गत अाठवड्यात निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने लढणार असून यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी
प्रत्येक तालुक्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्याचा आदेश जिल्हा अध्यक्ष यांना दिले आहेत.

🔹सात ग्रा. प. निवडणूक लढणार
तालुक्यातील धावडी, केंद्रेवाडी, अंबलवाडी, हनुमंतवाडी, वाकडी मुर्ती , दत्तपुर या 7 ग्रामपंचायत मध्ये 15 जानेवारी रोजी निवडणूक होत असून या सर्व ग्रामपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभा करून निवडणूक लढणार आहे.
*पत्राव्दारे दिले आदेश*
*******************
जिल्हाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात पुढील अादेश दिले आहेत.
१)निवडणुकीत वंचित समुहातील स्त्री-पुरुषांना संधी मिळेल, याची दक्षता घ्या.
२) निवडणुकीच्या कामाचे नियाेजन व त्यानुसार विभाजन करुन जिल्हा व तालुका कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांना देण्यात यावे.
३) शक्य तिथे प्रत्येक तालुक्यासाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. हे निरीक्षक त्या संबंधित तालुक्यातील नसावेत, असेही त्यांनी स्षष्ट केले अाहे.
“पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्ण ताकतीने लढविण्यात येणार आहेत. तालुक्यातील सात ग्रामपंचायतीमध्ये पक्ष निवडणुका लढविण्याची तयारी करीत आहे.”असे
अंबाजोगाई तालक्याचे वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष जांबुवंत उर्फ संजय तेलंग व तालुका प्रवक्ते गोविंद मस्के यांनी कळविले आहे.