खुर्चीवर बसुन गरीबीचे भान विसरु नये,याकरिता जिल्हाधिकारी यांना दिव्यांगांचे निवेदन

54

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.17डिसेंबर):- नांदगाव खंडे. येथिल सेंटल बॉक कडुन अपंगाना नाहक त्रास होत असल्याचे चित्र दिसत आहे. अपंग बेरोजगारांना रोजगार म्हणुन शासणाच्या शासन निर्णयाप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष साह्यय विभाग मुबंई 21 शासण निर्णय क्र,अपंग 2008/पत्र क्र,292 सुधार 3दि.2 जुलै 2010 रोजी नियमित करुण अपंग बेरोजगारांना 1,50,000/रुपायाचं कर्जाच बिज भांडवल योजना सुरु केली होती.

या योजने मध्ये एकुण दिड लाख, /- पैकी 20 %रक्कम जि.प. समाज कल्यान अपंग विभागातुन असुण अनूदान म्हणुन देण्यात येते. 80%रक्कम ही बॅक कर्ज म्हणुन देते. या मधुन अपंग बेरोजगारांना छोटा मोठा व्यवसाय करुण कुटुंबाची खडगी भरावी यासाठी व्यवसाय करावा लागतो.

असे आदेश असुण सुद्धा अमरावती जिल्हयातील नादगाव खंडे, येथिल अपंग बाधंव यांनी अपंग विभागाकडे अर्ज केले होते.व अपंग विभागाने गरीबी ची जान ठेवुण सदर अर्जाची शहानिशा करुण सेंट्रल बॅक आॅफ इडीया शाखा नांदगाव खंडेश्वर तसेच पापड येथिल इलाबाद बॅक यांचे कडे मंजुरी साठी पाठविले होते. पण बॅकेचे मॅनेजर हे खुर्चीवर बसल्या नतंर आपले भान विसरुण अपंगाना नाहक त्रास देतात. कर्ज मंजुर करण्याकडे कोणतेही कारण दाखवुण दुर्लक्ष करुण अपंगाची दिशाभुल करीत आहे.

तेव्हा बेरोजगारांना मानसिक त्रास सहण करावा लागत आहे.तरी शासण निर्णया प्रमाणे या बेरोजगार अपंगांना त्वरीत कर्ज मंजुर करुण त्यांचे व्यवसाय सुरु व्हावे म्हणुन आपल्या स्तरावर कार्यवाही करावी अन्यथा अपंग जनता दल सांमाजिक संघटणेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना मयुर मेश्राम,नादगांव खंडे,तालुका अध्यक्ष प्रदिप रघुते,शिवदास उईके,अशोक रेवतकर,विलास मारोटकर,किशोर माणेकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले..