वजनात काटा मारणाऱ्या कारखाण्यांवर कारवाई होणार

33

🔹जिल्ह्यात प्रशासकीय भरारी पथक स्थापन – श्रीनिवास भोसले

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.17डिसेंबर):–ऊस गळीत हंगाम 2020-21 साठी महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तालयामार्फत कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी शासनाकडुन पाच सदस्यीय कमीटी गठीत केली असुन शेतकऱ्यांचा प्रतीनीधी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले यांची नियुक्ती केली आहे.शेतकऱ्यांकडुन वारंवार होत असलेल्या वजन काट्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तांच्या आदेशाने हे भरारी पथक समीती गठीत केली आहे.त्यामुळे साखर कारखाने वजन काट्यात करत असलेल्या चोरीला आता वेळीच चाप बसणार असुन ही समीती हे कारखाण्यांचे वजनकाटे तपासून चुक आढळल्यास योग्य ती कारवाई करणार आहे.

ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा ऊस घेऊन कारखान्याला जातो तेव्हा कारखान्यांच्या काट्यात आणि बाहेर वजन केलेल्या खाजगी काट्यात मोठा फरक दिसुन येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले व संघटनेच्या ईतर पदाधिकारीं कडे केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने या विषयावरती साखर आयुक्तालयात ठान मांडुन कारखानदारांच्या काळ्या कारणाम्यांचा पाढाच वाचुन दाखवला होता त्यामुळे या चोरीला आळा घालण्यासाठी शासनातर्फे पाच सदस्यांची समीती गठीत केलेली आहे.

या समीतीत तहसीलदार ,पोलीस निरीक्षक ,वैधमापन शास्त्रीय,कनीष्ठ लीपीक,व शेतकरी प्रतिनिधी अशी पाच सदस्यांची समीती तयार केली आहे.भरारी पथकाच्या स्वरूपात ही समीती काम करणार असुन अचानकपने कारखान्यांचे वजन काटे तपासले जाणार आहेत.या समीती मुळे जे कारखाने वजनात घोळ निर्मान करतात त्यांना आळा बसुन शेतकर्यांची उघड लुट थांबनार आहे यामुळे शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मीळाल्याचे चीत्र आहे.

साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने शेतकर्यांच्या उसाच्या वजनाच्या बाबतीत तक्रार येत आहेत.व कारखान्याच्या वजनाच्या बाबतीत तक्रारी आल्यास योग्य ती कारवाई होण्यासाठी तसेच भरारी पथकाने कारखाना स्थळावर अचानक भेट देऊन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बरोबर असल्याची व वजनाची पावती बरोबर मीळत असल्याची खात्री करण्यासाठी हे पथक प्रशासकीय आधीकार्यांना सोबत घेऊन निष्ठेने काम करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले यांनी दिली आहे.