किन्ही (बेटाळा) गावकऱ्यांचा येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार

33

🔸महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा पात्र लाभार्थ्यांना डावलले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.17डिसेंबर):- आज 17 डिसेंबर रोजी गुरूवारला तालुक्यातील किन्ही (बेटाळा) या गावातील लोकांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी , ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले. सविस्तर विषय याप्रमाणे की, मौजा किन्ही (बेटाळा) त. ब्रम्हपुरी जी.चंद्रपूर येथे दि. 28-08-2020 ते 30-08-2020 ला वैनगंगा नदीच्या महापुरामुळे संपूर्ण किन्ही गाव पुराच्या पाण्याखाली आले. त्याचबरोबर गावशिवारातील शेती सुध्दा पाण्याखाली आली. त्यामुळे गावातील घरांची पडझड, पिकांचे , धान्यांचे नुकसान आदी जीवनावश्यक वस्तूंचे अपरिमित नुकसान झाले होते.

शासन – प्रशासनातील अधिकारी लोकांनी गावाला भेटी दिलेल्या होत्या. प्रशासनाकडून नुकसानीचे सर्वेक्षण सुध्दा झालेले आहे. परंतु भरपाई देताना ज्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे, त्यांना डावलण्यात आलेले आहे. याबाबत प्रशासनाला माहिती देऊन, निवेदन देण्यात आले होते. (आ.क्र.07/12/2020) तरी काही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे . या पारश्वभूमीवर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गावकऱ्यांची प्रशासनाला कडाडीची मागणी आहे की लक्ष्यपूर्वक गावकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. निवेदन देताना महिला मंडळी सोबत गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.