बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणातील आरोपीची बाजूने नागपूर येथील भुपेद्र सोने यांनी वकीलनामा केला दाखल

31

🔹पुढिल सुनावणी होणार ११,१२,१३ जानेवारीला

✒️सचिन महाजन(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.19डिसेंबर):-वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता पिस्सुडे जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला १४ डिसेंबर पासून हिंगणघाट येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. शुक्रवारी या खटल्यासाठी आरोपी तर्फ नागपूर येथील ॲड भुपेद्र सोने यांनी वकील नामा दाखल केला.

यावेळी आरोपी विक्की नगराळे याला ११ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते.या खटल्याची पुढिल सुनावणी होणार ११,१२,१३ जानेवारीला होणार आहे. यावेळी सरकार तर्फे ॲड प्रसाद सोइटकर हे न्यायालयात हजर होते.