सायकल स्नेही मंडळाची पर्यावरण जनजागृती रॕली संपन्न

56

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.18डिसेंबर):- सायकल स्नेही मंडळातर्फे साप्ताहिक जनजागृती रॕली सुरू करण्यात आलेली आहे. मास्क वापरा , हात स्वच्छ धुवा, सामाजिक अंतर पाळा ह्या संदेशासोबतच सायकल चालवा, आरोग्यवान बना असा जनजागृतीपर विशेष संदेशाचा प्रचार प्रसार करण्यात आला.

इंदिरा चौक ते कठाणी नदी मार्गाने सदर रॕली काढण्यात आली.ह्या रॕलीत मंडळाचे संयोजक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , कार्याध्यक्ष प्रा. विलास पारखी , प्रा . डाॕ. योगेश पाटील , विलास निंबोरकर , भोजराज कान्हेकर , प्रमोद राऊत , पुरूषोत्तम ठाकरे आदी ग्रामीण सदस्य सहभागी झाले होते.