धार्मिक तेड निर्माण करून राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एमआयएम निवडणुकीच्या मैदानात – युवा जिल्हा अध्यक्ष शेख राजू

72

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.19डिसेंबर):-धार्मिक तेड निर्माण करून दोन समाजात द्वेष निर्माण करून राजकीय अस्तित्व निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी एमआयएम येणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या ताकतीने मैदानात उतरणार असून एम आय एम मध्ये सर्व जाती-धर्माच्या नव युवक तरुणाची ओढ एमआयएम पक्षात प्रवेश करीत आहेत.

असे एमआयएम चे युवा जिल्हा अध्यक्ष शेख राजू यांनी परभणी आणि गंगाखेड तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी व पक्ष प्रवेश निमित्त दिनांक 18 डिसेंबर रोजी गंगाखेड तालुक्याचे अध्यक्ष शेख अजहर यांच्या निवासस्थानी आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थित अजमत खान साहब, खालील पठाण मामु शेख मुमताज शेख राजू ,एमआयएम जिल्हा उपाध्यक्ष, शेख अजहर तालुकाध्यक्ष हे उपस्थित होते.
एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फेरोज खान लाला, मराठवाडा सचिव कलीम रमजानी, मराठवाडा युवा अध्यक्ष ॲड. सय्यद वाजिद, परभणी जिल्हा अध्यक्ष ॲड. इम्तियाज खान, यांच्या आदेशाने परभणी जिल्हा गंगाखेड तालुक्यातील पक्षप्रवेश व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

एमआयएमच्या परभणी जिल्हा युवा उपाध्यक्ष म्हणून वाहज खान वाहब खान, जिल्हा युवा सचिव शेख नय्युम राज ,युवा तालुकाध्यक्ष गंगाखेड सय्यद सद्दाम, युवा तालुकाध्यक्ष फेरोज खान युनुस खान, युवा तालुका सचिव शेख जावेद, शहर युवा अध्यक्ष शेख इम्रान मदार,युवा शहर उपाध्यक्ष साबेर नय्युम पठाण, तालुका उपाध्यक्ष शेख नय्युम उस्मान, तालुका सचिव चाँद आली यांची निवड करण्यात आली.निवड करण्यात आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.