अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर न वाटप झालेल्या संदर्भात विधान मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे वसंत मुंडे यांनी केली तक्रार दाखल

30

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

मुंबई(दि.20डिसेंबर):- महाराष्ट्रातील खरीप 2020 ला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके उध्वस्त झाली,त्यामुळे शासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले व अतिवृष्टी चे पैसे शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला वाटप करण्यासंदर्भात पैसे वर्ग करण्यात आले,परंतु बीड जिल्ह्याचे पैसे जाणून-बुजून प्रशासनाकडून वाटप करण्यासंदर्भात दिरंगाई केली असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी महाराष्ट्र विधान मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली.

अगोदरच प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे बीड जिल्हा अंतर्गत आष्टी परळी केज येथील शेतकऱ्यावर अतिवृष्टी झाली नाही नुकसान झाले नाही असे खोटे कागदपत्र तयार करून शासनाकडून अहवाल सादर केला आहे. परंतु 25 सप्टेंबर पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात मध्ये अतिवृष्टी झालेली आहे. आणि त्या संदर्भातील 33/ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेली आहे असा अहवाल शासनाकडे सादर केला होता त्यानंतर 25 ते 30 ऑक्टोबर च्या दरम्यान पाऊस ही बीड जिल्ह्यामध्ये झाला नाही.परंतु प्रशासनाने तालुका कृषी अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी यांनी खोटे अहवाल सादर करून केज परळी आष्टी च्या शेतकऱ्यावर नुकसानभरपाई देण्यासंदर्भात अडथळे निर्माण केले.

त्यामुळे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या या चुकीच्या अहवाला संदर्भात नाराजी आसुन त्यामुळे संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाचे विधानमंडळाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, कृषिमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री, यांच्याकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे बीड केली आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अगोदरच कोरोना अतिवृष्टीमुळे तसेच बाजारपेठेचे भावाचे चढ-उतार शासनाचे असहकार्य धोरण मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे अतिवृष्टी बीड जिल्हा अंतर्गत अंबाजोगाई ,परळी, केज तालुके हे कसे काय निरंक म्हणून दाखवले आहे .यास तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी यांची समिती द्वारे अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानी संदर्भात शेतकऱ्याच्या पिकाबाबत अहवाल सादर केला जातो.

त्यावर शासनाकडे नुकसानीचा अहवाल दिल्यावर आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन कडून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्यासंदर्भात राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एन डी आर एफ )या निकषावर निर्णय घेतला जातो अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे . जे कोणी अधिकारी चुकीचा रिपोर्ट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकासंदर्भात सादर केलेला आहे त्यांची तक्रार महाराष्ट्र शासनाकडे करून कार्यवाही साठी पाठपुरावा करणार असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी सांगितले कारण माहे ऑक्टोबर 2020 शेती पिकाच्या नुकसानी साठी मदत विवरण पत्र 5 मध्ये परळी-वैद्यनाथ तालुक्यात ते 33/टक्के पेक्षा जास्त अधिक नुकसान झाले एकूण क्षेत्र 30092 हेक्टर असून शेतकरी संख्या 406 57 आहे.

तसेच शेती पिके कोरड वाहू प्रति हेक्टर 6800 दोन हेक्‍टरपर्यंत मर्यादा असून रक्कम 2045 .37 कोटी रुपये आहे व बहुवार्षिक पिके क्षेत्र 12.7 शेतकरी संख्या 13500 व 1. 71 हेक्टर एकूण अनुदान 2047.08 आवश्यक अनुदान हा अहवाल शासनाकडे दिलेला आहे तो खोटा आहे का असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे .महा विकास आघाडी सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत करण्याची घोषणा केली परंतु जिल्ह्यांतर्गत राजकारण सुरू झाले व शेतकरी बळीचा बकरा झाला आहे.

शासनाकडे 25ऑक्‍टोबरमध्ये अहवाल विवरणपत्र ड आणि अ नुकसानभरपाईचा देण्यात आला नंतर 30ऑक्टोंबर मध्येच विवरणपत्र 5 अ विवरणपत्र 5 ब परळीच्या शेतकऱ्याला मदत करता येत नाही असे निरंक दाखवले कोणी याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली असल्याचे सांगितले. प्रपत्र अ व ड मध्ये ते 33/ टक्के परळी तालुक्यामध्ये नुकसान झाल्याचा अहवाल दर्शवला ऑक्टोंबर मध्येच 5 अ व ब मध्ये खोटा अहवाल कोणी तयार केला याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली आहे 25 ऑक्टोंबर पुर्वी जो 33% रिपोर्ट दिलेला आहे ते ग्राह्य धरून शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टी अनुदान वाटप करण्यासंदर्भात महाराष्ट्र विधान मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.