गणिताचा श्रीगणेशा – श्रीनिवास रामानूज

30

आज आपण पाहतो, जिवनात, समाजात, दैनिक व्यवहार मध्ये प्रत्येक गोष्टीत ताळा आहे. ताळा चुकला की, दैनदिन जिवनातील गणित चुकलं, किंबहुना रोजच्या स्वयंपाकघरात बघा, थोडे गणित चुकलं स्वयंपाक करताना तर जेवन बे -चव होउन जात. शेती घ्या पेरणी करताना दोन पाकमधील अंतर, मळणीकालालधी, काढलेला माल (धान्य) किती ?झाले? याचे गणित मायबळीराजा करतच असतो. त्या साठी किती पोते लागतात, हे एक गणितच आहे, आणि अमुक धान्य ईतके पोते, (मन) झाले म्हणून सांगतो, मग जिथ गणिताशीवाय काहिच शक्य नाही, जिवनात गणित प्रत्येक जागी आपणास पाहावयास मिळत,किंबहुना मतदान असो, कि कुठलेही दैनदिंन व्यवहारात असो गणिताचा वापर केला जातो.

गणित हा सर्व विषयांचा आत्मा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, डॉ सुध्दा तापमापी तापमान मोजणी करण्यात येत, , इंजेक्शन्स,किती ml भरायचे हे ठरवूनच मगच इंजेक्शन्स भरतो, सीरीज, किती ml ची असणे गरजेचे आहे हे बघुनच सीरीज माणसाला चढवत असतो, असे एक नाही तर बरेच उदाहरण आपणास देता येईल, शालेय अभ्यासक्रमात गणिताला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. आज महाराष्ट्रात बरेच विद्यार्थी जर नापास होतांना दिसत आहे तो गणिताचा विषयात, असे आहे तरी काय? या गाण्यामध्ये खरे तर परीक्षेत जास्त गुण मिळवून देणारा विषय हा गणितच आहे. कारण गणिताचा पेपर सोडवला आणि तुमचे उत्तर जर बरोबर आहे तर आपल्याला पैकी पेकी पैकी गुण हे गणितातच मिळते. 

असेच श्रीनिवास रामानूज हे मुळ भारतीय गणित शास्त्रज्ञ, पण आपण प्रचलीत ईतर विषयात शास्त्रीय भाषेत आपण त्यांना शास्त्रज्ञ म्हणतो. पण गणितामध्ये संशोधन करणार्‍या व्यक्तीला आपण गणितज्ञ म्हणून संबोधण्यात येत. श्रीनिवास रामानूज यांनी भायताघी ओळख गणिताचा संशोधन कर्ता म्हणून अग्रगण्य नाव समोर येत. रामानूज यांनी खरे गणित समाजाला समजावून सांगितले. यांचा जन्म २२डिसेंबर १८८७ला झाला व मृत्यू २६एप्रिल १९२०तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या दिवशी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्याची घोषणा केली, रामानुज प्रमाणे भारतीय गणितज्ञ म्हणून भारताची शान असलेले आर्यभट्ट, शकुंतला देवी, सी, आर, राव, सी, एस, शेषाद्री, हे पण भारतीय गणितज्ञ होउन गेलेत, गाण्यामध्ये जर प्रगती करायची असेल तर खालील बाबी लक्षात घ्यायला हवे.

अ) विषयाची मुलभुत माहिती आणि त्या मुलभुत क्रिया समजणे
ब) स्वतः अभ्यास करणे,,,,, (स्वयं अध्ययन)
क) सतत अभ्यास करणे,
ड) लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने आकलन करून गणिती संख्याच्या साह्याने आकडेमोड करणे,
ई) दैनंदिन जीवनात गणिताचा उपयोग व वापर करून घेणे,

✒️लेेखक:-गजानन गोपेवाड
(पदवीधर शिक्षक)
जि, प, केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा, पंचायत समिती महागांव, जि, यवतमाळ,