बहुउद्देशिय संस्था शिवणी तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

28

✒️प्रदिप रघुते(नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी)मो:-9049587193

नांदगाव खंडेश्वर(दि.21डिसेंबर):- अमरावती जिल्ह्यातील तहसिल नांदगाव अतर्गत फुबगाव येथे.नुकतेच स्व.बहिणाबाई भाऊराव गावंडे बहुउद्देशिय संस्था शिवणी (रसुलापूर) तर्फे मस्जिद हॉल फुबगाव येथे ‘रक्तदान शिबिर’ संपन्न झाले.रक्ताचा तुटवडा व मा.मुख्यमंत्री मा.ना. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानामुळे रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील रक्तपेढी संकलन केंद्राने रक्त संकलन केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज गावंडे, मोसम शेख , कासीम शेख ,रवी भोयर,कुणाल तऱ्हेकर , अथर खान,राजेश भोयर,विनोद धुमनखेडे,सूरज भोयर इ. युवकांनी रक्तदान केले व शिबिर यशस्वी केले. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.