ब्रम्हपुरी येथिल घनकचरा साठवणूक गृह दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करावे

28

🔹नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.21डिसेंबर):- राजीव गांधी सभागृह येथे ना. श्री एकनाथजी शिंदे व संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला, या वेळेस ब्रम्हपुरी शहरातील काही समस्या बाबत शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात शहर शिवसेना ब्रम्हपुरी तर्फे ना.एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना ब्रम्हपुरी शहरातील घनकचरा साठवणूक गृह दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करून त्या ठिकाणी बगीचा निर्माण करण्यात यावा, या करिता निवेदन देण्यात आले.घनकचरा गृह हा शहराच्या मुख्य भागी असल्यामुळे तिथे ने.ही महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पोलिस कॉलनी, शारदा कॉलनी, गांधी नगर असे रहिवासी ठिकाण आहेत.

घनकचरा गृह जिथे आहे तो भाग शहराच्या वर्दळीच्या रस्त्यापैकी एक आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना असाहय दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. त्या मुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घनकचरा गृह शहरापासून 2 ते3 की.मी लांब स्थलांतरीत करण्यात यावा, या करिता ना एकनाथजी शिंदे यांना निवेदन ब्रम्हपुरी शहर शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले. या वेळेस शहर प्रमुख नरूभाऊ नरड, माजी तालुका प्रमुख नरेन्द्र गाडगीलवार , उप तालुका प्रमुख पराग माटे,निखिल राऊत आकाश शेंद्रे,अमोल माकोडे व शिवसैनिक उपस्थित होते