आयकॉन च्या माध्यमातून युवकांसाठी व्यावसायिक कौशल्य कार्यशाळा

35
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभिड(दि.21डिसेंबर ):-वाढती सुशिक्षितांची बेरोजगारी लक्षात घेऊन तुकुम् येथील सामाजिक क्षेत्रात अविरत काम करीत असणारी आयकॉन बहुद्देशीय संस्थेने युवकांसाठी दिनांक 16 डिसेम्बर 2020 ला तुकुम ता. नागभीड़ जिल्हा चंद्रपुर येथे व्यावसायिक कौशल्य कार्यशाळा आयोजित करून युवकांसाठी नवीन उद्योग कसे स्थापित करता येईल या बाबत विशेष उपस्थितांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून मा. विलास गजबे सर(सहाय्यक शिक्षक).तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. आर. खोब्रागडे यांनी उत्कृष्ट व्यावसायिक उद्योगाबाबत मार्गदर्शन केले.तसेच आयकॉन चे संचालक प्रा. पवन माटे यांच्या सखोल प्रयत्नातून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी युवकांचा विकासातून सामाजिक क्षेत्रातील परिवर्तन करता येईल हा ध्येय लक्षात ठेऊन या कार्यशाळेचे आयोजन केले. तसेच यावेळी युवकांनी सुद्धा यात सहकार्यात्मक सहभाग दर्शविला.व सदर कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.