माण तालुका थंडीने गारठला

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.21डिसेंबर):-माण तालुक्यात गेले दोन ते तीन दिवसांपासून थंडीने उच्चाकं गाठला असून तापमान 31 -32 अशापर्यत खाली आल्याने संपूर्ण माण तालुका थंडीने गारठला असून तालुक्यात पहाटेचे धुक्याचे प्रमाण वाढले आहे.वातावरणात गारवा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने गावोगावी,खेडोपाडी लोकं शेकोट्या पेटवून आपली थंडी घालवण्याचा प्रयत्न करत असताना दिसतायत.

त्यातच ग्रामपंचायत निवडणुकांचा हंगाम चालू झाल्याने रात्रीपर्यत शेकोटीजवळ आपले हात शेकत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत.

संध्याकाळी सहा वाजले नंतर थंडीचे प्रमाण वाढत असून दुपारीपन वातावरणात गारवा जाणवत आहे.संध्याकाळी बाजारपेठा थंडीमुळे ओस पडत आहेत.पहाटे धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने सर्वत्र दव बिंदू पडलेले दिसून येते त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना अडचणी निर्माण होत आहे.