कराड येथे २४ रोजी 21 वी बौद्ध धम्म परिषदेचे ऑनलाईन आयोजन

35
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो.9075686100

म्हसवड(दि.21डिसेंबर):-भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा व कराड तालुका यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद.मिराताई आंबेडकर यांच्या मागदर्शना खाली गेली 20 वर्ष बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जात आहे . दि .14 ते 24डिसेंबर 2020 या कालावधीत विविध शिबिरांचे आयोजन केले आहे.

त्या सर्व शिबिरांचा समारोप या धम्म परिषदे मध्ये होणार आहे दर वर्षी हजारो उपासक उपासिका उपस्थित राहतात पण या वर्षी कोरोना या आजारामुळे प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी जिल्ह्यातील जास्तीतजास्त बौद्ध उपासक ,उपसिकांनी ऑनलाईन सहभागी होऊन उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अध्यक्ष व्ही .आर .थोरवडे साहेब यांनी केले आहे . झिमरे वस्ती कराड येथील महा विहारामध्ये श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबिरामध्ये 20 श्रामणेरानी भाग घेतला आहे शिबिराचा समारोप या परिषदे मध्ये होणार आहे.
झिमरे वस्ती कराड येथील महा विहारामध्ये मोजक्या व मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बौद्ध धम्म परिषदेच्या अध्यक्ष स्थान सातारा जिल्हा चे अध्यक्ष व्ही .आर .थोरवडे साहेब भूषवणार असून या परिषदेसाठी पूज्य भन्ते दिपंकर ,भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई, राष्टीय सचिव एन .एम .आगाणे,एस .एस.माने , महाराष्ट्र सचिव आनंदा सातपुते ,लिबूनी बाग अध्यक्ष मंगेश आडसुळे, सांगली जिल्हा अध्यक्ष साहेबराव लोखंडे, पारेषनचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर सुदाम ढापरे , वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खडाईत, सेवानिवृत्त असि . कमिशनर सेंटर एक्ससाईज व्ही .एस गायकवाड , साहेब जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीमंत घोरपडे, सर अविनाश बारशिंग,सर डॉ मीनाताई इंजे, आबासाहेब भोळे,सर दादासाहेब भोसले, सर अरविंद आडसुळे,, कराड तालुका अध्यक्ष तानाजी बनसोडे, असि .संचालक वित्त विभाग सातारा चे अरुण गायकवाड साहेब आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या परिषदेसाठी सातारा जिल्हा व कराड तालुक्यातील जस्तीतजास्त बौद्ध उपासक ,उपसिकांनी ऑनलाईन सहभागी होऊन उपस्थित रहावे आसे आवाहन भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा चे जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड यांनी केले आहे .