जातिअंतक राजकीय चळवळीला सक्षम करण्यासाठी “वंचितनामा”ला बळकट करा – अशोकभाऊ सोनोने

28

✒️बुलढाणा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बुलढाणा(दि.21डिसेंबर):- जातिअंतक राजकीय चळवळीला सक्षम करण्यासाठी वंचितनामा महान्यूज पोर्टलला बळकट करण्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेट्री बोर्ड सदस्य तथा भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने यांनी “वंचितनामा” महान्यूज पोर्टलच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले.

या उद्घाटन सोहळ्याला वंचितनामा महान्यूज पोर्टलचे मुख्य संपादक अमरदीप वानखडे, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. भारत सिरसाट, ज्येष्ठ साहित्यिक रमेश डोंगरे, भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या माजी अध्यक्षा अनीता डोंगरे, वंचित बहुजन युवक आघाडीचे खामगाव तालुकाध्यक्ष नीतीन सुर्यवंशी, “वंचितनामा”चे उपसंपादक पवन गवई, रत्नदीप वानखडे, अनुमती वानखडे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. भारत सिरसाट बोलतांना म्हणाले की, उपेक्षित वंचित घटकाला नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातुन सत्तेपर्यंत नेण्याचा क्रांतीगर्भ विचार म्हणजे “वंचितनामा” महान्यूज पोर्टल आहे. फुले-आंबेडकरी तत्वविचार रूजविण्यासाठी नव्या पिढीचा, नव्या विचाराचा हुंकार वंचितनामा महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी वंचितनामा वेब पोर्टलचे संपादक अमरदीप वानखडे बोलतांना म्हणाले की, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज या महान्यूज पोर्टलचे उद्घाटन होत आहे. वंचित बहुजन समूहाला माध्यमामध्ये स्थान मिळावे यासाठीची ही जातिअंतक राजकारणाची चळवळ आज उभी होत असतांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. नव्या युगाच्या नव्या डिजिटल माध्यमाद्वारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिका व्यापक स्वरूपात आपल्यासमोर पोहचविण्यासाठीचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी वानखडे म्हणाले