भरधाव वाहनाने हुलकावणी दिल्याने डिझेल भरलेला टॅंकर  उलटून 10 हजार लिटर डिझेल रस्त्यावर सांडले

33

🔺नेर जवळील सुरत महामार्गावरील पाझंरा नदी काठावरील मोठ्या पुलाच्या वळणावर झाला अपघात

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

नेर(दि.22डिसेंबर):– दि.२०/१२/२०२० रोजी भरधाव वाहनाने हुलकावणी दिल्याने डिझेल भरलेला टॅंकर उलटून सुमारे १० हजार लिटर डिझेल रस्त्यावर सांडले गेले. हा अपघात धुळे तालुक्यातील नेर जवळील सुरत ते नागपुर महामार्गावरील पाझंरा नदी काठावरील मोठ्या पुलाच्या वळणावर रविवारी रात्री ११वाजता घडला. सुदैवाने टॅंकर न पेटल्याने पुढील अनर्थ टळला. 

या बाबत अधिक माहिती अशी की. अहमदाबादहुन औरंगाबादकडे क्र एम एच 46-BB 2590 डिझेल भरलेला टॅंकर रविवारी रात्री जात असताना समोरील वाहनाने हुलकावणी दिल्याने रात्री ११ वाजता उलटला. या टॅंकरमध्ये २५ हजार लिटर डिझेल भरलेले होते. तर टॅंकर उलटल्याने त्यातील  ९ते १० हजार लीटर डिझेल पलीकडील जमीनीवर पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने जिवितहानी टळली ड्रायव्हर,सहचालकाने प्रसंगावधान साधत शेतात उडी मारल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.

अपघात पुढील तपास सुरु आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरा पर्यंत सुरु होते. रात्री नेर पोलीस दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचारी राकेश मोरे यांना आवाज आल्याने तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली व किरकोळ जखमीस  खाजगी दवाखान्यात जखमीस उपचारासाठी पाठवले. तसेच या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.