शेतकर्यांचे प्रश्न आणि कृषी धोरणाविरोधी ‘मराठा सेवा संघ’ व संभाजी ब्रिगेडने केले एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह!

32

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.22डिसेंबर):-केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात हजारो शेतकरी दिल्ली च्या सिमेवर आंदोलन करुन राहले. या आंदोलनाच्या समर्थनात ‘मराठा सेवा संघ’ व संभाजी ब्रिगेडने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह केले. कृषीविषयक कायद्यांद्वारे मोदी सरकार शेतकर्यांची जमिन आणि त्यांच्या जेवणाचा घासच काढु पाहत आहे. पण आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, शेतकर्यांशी बैमानी केल्यास केंद्र सरकारला शेतकरी धडा शिकवतील. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक, शिवश्री तुषारदादा उमाळे यांनी येथे बोलत असतांना दिला.

सोमवार सकाळी ११ वाजता पासुन साय. ५ वाजेपर्यंत हे आंदोलन चालत राहले.या आंदोलनामध्ये सांगीतल्या गेले. शेतात रांत्रंदिवस राब राब राबनारा शेतकरी देशाचा पोशींदा ज्याला म्हटल्या जातं तोच शेतकरी आज संकटात आहे. सरकार द्वारा शेतकरी आंदोलनाला दाबण्याची कोशिश केली जात आहे. २५ दिवस होऊनसुद्धा शेतकरी आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही. अन्नदाता शेतकर्याच्या आंदोलनाला समर्थन देता वेळी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने कृषीविषयक कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे.

यावेळी उपस्थित अरविंद गावंडे , प्रदिप गावंडे, अरविंद अढाऊ, शिलाताई पाटिल, गणेश हलकारे, बाबा भाकरे, सय्यद अफसर अली, डॉक्टर रहीम भारती, करन तायडे, अजिंक्य पाटिल, मिलिंद ढेवले, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक तुषारदादा उमाळे, प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर , अनेक नामवंत वक्तयांनी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याचा समाचार घेतला.