जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकताच नवे अकरा करा खरेदी केंद्र सुरू

86

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

बीड(दि.23डिसेंबर):- जिल्ह्यात कापूस खरेदी हंगाम सन 2020-21 मध्ये शासकीय हमी भावानुसार कापूस खरेदी सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ यांचे मार्फत चालू आहे. तालुक्यामध्ये सीसीआयची 11 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर, गेवराई येथील 7 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर व वडवणी येथील 2 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी चालू आहे.

या तीन तालुक्यात दि. 21 डिसेंबर, 2020 अखेर एकूण 2,43,5 9 4 क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत माजलगाव तालुक्यात 4 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर, परळी तालुक्यात 1 जिनिंगवर, केज तालुक्यात 4, धारुर तालुक्यात 6 अशी एकूण 15 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी चालू आहे.

दि. 21 डिसेंबर , 2020 अखेर या चार तालुक्यात एकूण 2,64.071 क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. जिल्ह्यामध्ये व्यापार्‍यांकडून 1,42,177 क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. जिल्ह्यामध्ये सीसीआय, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व खाजगी खरेदी अशी एकूण 6,4 9 , 842 क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे.

महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाची परळी तालुक्यात 4, माजलगाव तालुक्यात 5, केज तालुक्यात 1 व आष्टी तालुक्यात 1 अशा एकूण 11 कापूस खरेदी केंद्रांना नव्याने मंजुरी मिळालेली आहे. सदर नव्याने सुरू होणार्‍या 11 कापूस खरेदी केंद्रांवर जिल्हाधिकारी , बीड यांचे दि . 21 डिसेंबर , 2020 रोजीचे आदेशान्वये 16 ग्रेडरची नियुक्ती करण्यात आलेली आहे.