समाजात समानता, बंधूता निर्माण करणेसाठी शाहू महाराजांचे योगदान मोलाचे

62

🔹किशन गोयल यांचे प्रतिपादन

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.23डिसेंबर):-महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान हक्क दिलेले असून अशा मानवी अधिकारांवर गदा येत असल्यास मानवाधिकार कार्यकर्त्यांनी अशा शक्तींविरुद्ध लढण्यासाठी सदैव सजग राहायला हवे . तसेच समाजामध्ये समानता , बंधुता व सर्व घटकांसाठी समान संधी उपलब्ध होण्यासाठी कोल्हापुरातील शाहू महाराजांचे योगदान मोठे असून व त्यांनी सर्वप्रथम कष्टकरी वंचित उपेक्षित घटकांसाठी आरक्षणाची क्रांतिकारी सुरुवात केली.

याच विचारांचा वारसा जपण्याचा मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट नवी दिल्ली संपूर्ण भारतभर करणार असल्याचे त्यांनी कोल्हापूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात शिवशाहीर आझाद नायकवडी यांच्या बहारदार पोवाड्याने झाली.

दरम्यान कोविंड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रीय सहसचिव मोहम्मद यासीन शेख यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रीय सहसचिव , अशी पदोन्नती देण्यात आली तसेच शिव शाहीर आझाद नायकवडी यांची महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी निवडीची घोषणा किशन गोयल यांनी केले तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे ओळखपत्र यांचे वाटप करण्यात आले.

मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे पदाधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत प्रदेश सचिव मोहम्मद अस्लम सिद्दिकी, मीडिया प्रभारी शरद शर्मा ,राजस्थान राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र प्रधान, प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर ,प्रदेश सचिव सुभाष भोसले ,भगवान गुरव, राजेंद्र सूर्यवंशी ‘महेश नन्दे अंबाना माळी व कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव वाघमोडे यांनी केले.