कुंडलवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जी.एस.पेंटे यांची बदली

33

🔹ज्ञानेश्वर ठोंबरे नवे मुख्याधिकारी

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.26डिसेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जी.एस.पेंटे यांची बदली लोहा येथे करण्यात आली असुन ही बदली प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे आदेश नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी काढले आहेत.

तसेच कंधार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची बदली कुंडलवाडी नगरपरिषदेत करण्यात आली आहे. तसेच दोन्ही मुख्याधिकारी यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश नगरविकास वगभागाने जारी केलेल्या बदली आदेशात नमूद केले आहे.