संघर्ष टाळून एकजुटीचे दर्शन घडवा

25

🔹बिनविरोध ग्रामपंचायतींना आमदार अंतापुरकर देणार पाच लाखाचा निधी

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.26डिसेंबर):-होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीत गावातील ईच्छुक उमेदवारांची वाढती संख्या यातून निर्माण होणारी गटबाजी,दुरावा,वेळ व पैशाची नासाडी हे सर्व टाळण्याच्या दृष्टीने तसेच गावात असलेले सलोख्याचे वातावरण कायम राहवे एकजुटीनं गावचा विकास साध्य करता यावा यासाठी म्हणून गावच्या एकजुटीने शक्य असलेल्या ग्राम पंचायतीची निवडणुक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी केली आहे.

सोबत देगलुर-बिलोली विधानसभा मतदार संघातील ज्या ग्रामपंचायती गुणागोविंदानं बिनविरोध निघतील अशा ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी पाच लाख रूपये निधी देणार असल्याचे सांगितले आहे.बिलोली तालुक्यात ७३ पैकी ६४ तर देगलुर तालुक्यात 91 पैकी 85 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत यामध्ये गाव पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन बिनविरोध निवडणूकीसाठी प्रयत्न करावेत असे मतआमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी व्यक्त केले आहेत.