कुमरेज येथे शिंदखेडा तालुका मधील पोलीस पाटील पोलीस पाटील व पत्रकार बांधव करोना योद्धा सन्मान सोहळा दिमाखात संपन्न

28

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.26डिसेंबर):- शिंदखेडा, शिरपुर, दोंडाईचा भागातील पोलीस पाटील यांचा सन्मान सोहळा शिंदखेडा तालुक्यातील कुंब्रज येथील गायत्री मंदीर परीसरात दिमाखात पार पडला…. या वर्षी करोना संकटकाळात गावातील पोलीस पाटील यांनी जीवावर उदार होऊन दिवसंरात्र कार्य करून प्रशासनाला मदत केली….,याबद्दल मा.श्री.विक्रांत बादल साहेब उपविभागिय दंडाधिकारी शिरपुर , तसेच मा.श्री.सुनिल सैंदाणे साहेब तहसीलदार शिंदखेडा यांच्या हस्ते पोलीस पाटील यांचा करोना योध्दा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चा च्या अध्यक्षा सौ गीतांजली कोळी यांनी पोलीस पाटील यांना अनमोल मार्गदर्शन करून गावागावात दारूबंदी यशस्वी पणे राबविण्याचे आवाहन करून गावात ग्रामरक्षक दल स्थापन झाल्यास पोलीस पाटील यांना निश्चित च मदत होईल असे सांगितले.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात *मा.श्री.विक्रांत बादल साहेबांनी* गावोगावीच्या कार्य करणा-या पोलीस पाटील यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न शिल राहण्याचे सांगून उत्कृष्ट कार्य करणा-या पोलीस पाटील यांच्या कामगीरी चे कौतुक केले.. पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी प्रमुख पाहूण्यांचे आभार मानले….याप्रसंगी पत्रकार अविनाश वाडीले,प्रवीण भोई,युवराज माळी, सामाजिक कार्यकर्त्या सौ अलका कापुरे, प्रियंका जोशी , सौ.मनिषा पाटील,पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी व पोलीस पाटील महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….