परिते ग्रामपंचायत निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पुर्ण ताकदीने लढवणार – गणेश पावसे

30

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.28डिसेंबर):-राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला असुन त्या पार्श्वभूमीवर परिते ता.माढा या गावची ग्रामपंचायत निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना समवेत घेऊन आ.बबनदादा शिंदे व आ.संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण ताकदीने लढवणार असल्याचे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. गणेश पावसे यांनी सांगितले आहे.

देशाचे नेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात राष्ट्रवादी,काँग्रेस व शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग करुन जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलेलं आहे त्यामुळे गावपातळीवरतीही या तिन्ही पक्षांतील लोकांना सर्व मतभेद विसरून एकत्र आणून आम्ही परिते गावाची ग्रामपंचायत निवडणुक पुर्ण ताकदीने लढवणार असल्याचे श्री.गणेश पावसे यांनी स्पष्ट केले आहे.

गावच्या विकासाची आ.बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आ.संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परिते गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.जनता आम्हाला या निवडणुकीत नक्कीच मनापासून साथ देईल व सेवेची संधी उपलब्ध करून देईल असा ठाम विश्वास .पावसे यांनी व्यक्त केला आहे.