विजयस्तंभ

29

भीमा नदीच्या तिरावरती
सैनिकाची भरती आली.
महार सैनिक व पेशवाई फौजेत
रणसंग्रामाला सुरूवात झाली….

पेशवाईची फौज पाहुनी
कँप्टनची घाबरगुंडी उडाली.
महार सैनिकाच्या गर्जनेनं
भीमा-कोरेगाव नगरी दुमदुमली…

भीमा नदीच्या जलामध्ये
रक्ताचे पाट वाहीली.
सिदानाकच्या क्रांती पराक्रमाने
पेशवाईची दाणादाण उडाली…

हजारोवर्षाची गुलामगिरी
महार सैनिकाने फेकून दिली.
पेशवाईनी लादलेल्या अमाणूषतेला
समशेरीने कापून टाकली..

पंचवीस हजार पेशव्यांना
पाणी पाजले पाचशे महारांनी.
जगात अजरामर केली
युध्दनीती नाग लोकांनी…

पेशवा सैनिक भयभीत झाले
महार सैनिकाचे शौर्य पाहुनी.
सैरावैरा पळू लागली
शस्त्र आपले खाली सोडूनी…

विजयस्तंभ क्रांतीयुगाने
लढण्यासाठी प्रेरणा दिली.
क्रांतीनायकाच्या अतुलतेवर
अभिवादनाचे गीत रचली….

✒️संदीप गायकवाड
नागपूर(मो:-९६३७३५७४००)