सहा लाख 12 हजार 500 रुपयांचा राशनचा तांदूळ जप्त

31

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.28डिसेंबर):- जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने रविवारी सायंकाळी गंगाखेड शहरातील मोंढा भागात छापा टाकून सहा लाख 12 हजार 500 रुपयांचा राशनचा 35 टन तांदूळ जप्त केला, असे बोले जात आहे.

गंगाखेडमध्ये मोंढा भागात मोठ्या प्रमाणात राशनचा तांदूळ आला असून तो काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक दडस, फौजदार विश्वास खोले, पोलीस कर्मचारि सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहूल चिंचाने, शंकर गायकवाड़, अजहर पटेल, विष्णु भिसे, दिपक मुदिराज आदींच्या पथकाने मोंढा परिसरात बेकायदेशीररित्या ठेवलेला राशनचा तांदूळ छापा टाकून जप्त केला.

तेथील पोत्यांची तपासणी केली असता त्यात राशनचा तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. सर्व पोत्यांची पाहणी करून त्याचे वजन केले ऐकून 35 टन राशनचा तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तेथील एक वाहन जप्त करून तांदळाची वाहतूक करण्यासाठी वापरले जात होते. यावेळी पथकाने तेथील दोघांना ताब्यात घेतले.

दरम्यान, याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून सहा लाख 12 हजार 500 रुपयांचा 35 टन राशनचा तांदूळ तांदूळ व तीन लाख 50 हजार रुपयांचे वाहन असा एकूण नऊ लाख 62 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे तसेच दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.