✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.28डिसेंबर):-रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, मानव विकास सामाजिक शैक्षणिक क्रीडा बहुउदेशीय संस्था गडचिरोली अंतर्गत गडचिरोली येथे 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत रोजी आरटीओ कार्यालयाजवळील गोंडवाना विद्यापीठासमोर तीन दिवसाची रस्ता सुरक्षा जागरूकता शिबीर मोफत नेत्र तपासणी चा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमात नेत्र रोगाचे प्रमुख पाहुणे डॉ किरण मडावी उपस्थित होते आणि मानव विकास सामाजिक शैक्षणिक क्रीडा बहुउद्देशीय सोसायटी गडचिरोलीचे सर्व सदस्य व कामगार उपस्थित होते.कार्यक्रमात देशात रस्ते सुरक्षा आणि अपघात होतात आणि डोळ्यांच्या अभावामुळे अपघात वाढतात.रस्त्यावर चालत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे ही माहिती उपस्थितांना सांगण्यात आली.

कोविड 19 च्या पार्श्वीभूमीवर सर्व नियमाचे पालन करण्याचे काम यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम सर्व सामान्य लोकांद्वारे पूर्ण झाला आणि रुग्णालयाच्या वाहन चालक, ट्रक चालक, बस चालक, ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटरकडून पाठविलेल्या प्रशिक्षणार्थींना डोळे तपासून औषधे व चष्मा देऊन उपचार केले गेले.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED