ब्रम्हपुरीच्या पोलीसांनी कोरोना काळात केलेल्या कामगीरीचे कौतुक

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.28डिसेंबर):-ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणाऱ्या 70 पोलीस व 4 अधिकाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या विशिष्ट कामगिरी बद्दल कौतुक करण्यात आले . ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या आवारात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ठाणेदार मल्लीकाअर्जुन इंगळे यांनी भुषविले व प्रमुख अथिती म्हणून मुंबईचे जी.एस.टी. आयुक्त समीर बजाज उपस्थीत होते . या कार्यक्रमातंर्गत सर्व स्टाफला जीवना उपयोगी सामुग्री चे वाटप करण्यात आले.

चि . आदित्य समीर बजाज वय वर्ष 15 याने कोरोना काळात आपले नातेवाईक व ओळखीच्या लोकांमार्फत जवळपास 1 लाख रु . जमा केले . त्यापैकी 50 हजार रु.चे साहित्य मुंबईतील धारावी च वडाला विभागातील कोरोना पिडीत परिवाराला देण्यात आले . तर उपरोक्त कार्यक्रमाकरीता 25 हजार रु . आदित्य समीर बजाज तर्फे देण्यात आले तर 15 हजार रु . चा खर्च प्रयास बहुदेशीय संस्था , ब्रम्हपुरी तर्फे करण्यात आले . कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा . सुभाष बजाज , सौ.आभा समीर बजाज टी.सी.एस. मूबई, नारायण बोकडे, हरिश्चंद्र चोले व नेताजी मेश्राम संपादक ब्रम्हपुरी ब्लास्ट व श्री . निलेश मोहता रामदेवबाबा सॉल्व्हेंट चे संचालक हजर होते.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा . मंजूषा बजाज ने केले योजने ची पूर्ण माहिती आदित्य समीर बजाज व कु . सीमरन समीर बजाज यांनी दिली . श्री. समीर बजाज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षनीय भाषणात ठाणेदार श्री. इंगळे यांनी आदित्य समीर बजाज च्या कार्याचे कौतुक केले व कार्यक्रमाकरीता धन्यवाद दिले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पोलीस तर्फे श्री . देशमुख मेजर तसेच ने.ही. कॉलेज ब्रम्हपुरीचे रोशन डांगे , श्री . मोरेश्वर हटवार तसेच सॉल्व्हेंट प्लांट चे ब्रम्हा ढोरे यांनी विशेष परिश्रम घेतले .