भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी च्या १३६ व्या स्थापना दिन

28

✒️अंबादास पवार(शेगाव प्रतिनिधी)मो:-9561905573

शेगांव(दि.28डिसेंबर):-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी च्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया यांचे हास5 ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या “काल- आज-आणि उद्या” च्या वाटचालीवर चर्चा करण्यात आली.

ह्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले,माजी नगराध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष शैलेंद्र दादा पाटील, तालुकाध्यक्ष विजय काटोले, ज्येष्ठ नेते गोपाल भाऊ कलोरे,नगरसेवक शेख नईम शेख जमाल, माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष पवन पचेरवाल, शहर सरचिटणीस दिलीप पटोकार, प्रकाश शेगोकार, संतोष माने, थोरात काका, आत्माराम शेजोळे, माजी अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शेख असलम शेख युसुफ, माजी काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष महिंद्रा अग्रवाल जी, गजानन लहाने, किसन सिंग उपस्थित होते.