(अष्टाक्षरी कविता)

दोन हजार वीस हे ।
भारी गा सरते वर्ष ।।
उरी अमिट हे ठसे ।
जाता जगा होतो हर्ष ।।१।।
साल आला जीवघेणा ।
सवे घेऊन विकार ।।
नाव तया गा कोरोना ।
असो सदैव धिक्कार ।।२।।
यात बहु जीव गेले ।
झाले कैक निराधार ।।
स्पर्श नाही कोणी केले ।
जरा नुरे प्रेमाचार ।।३।।
नेली गा रोजी मजुरी ।
कैक हो बेरोजगार ।।
बहु सोडून नोकरी ।
दूर राहे वधू वर ।।४।।
लंपी आजाराने ग्रस्त ।
गाई गुरे ती जर्जर ।।
सारे प्राणी मात्र त्रस्त ।
गमे दुःखाचा बाजार ।।५।।
वारे वादळ भूकंप ।
खुप करूनी हैदोस ।।
सुटे कृषकाशी कंप ।
साही होता न उदास ।।६।।
येवो शुभ नव वर्ष ।
असे जन मन बोले ।।
होई स्वागताचा हर्ष ।
मोदे हा ‘कृगोनि’ डोले ।।७।।

(!! नियमित चांगले वाचनाची सवय लावून ठेवी खुश, वाचत रहा ‘पुरोगामी संदेश’ !!)

✒️कवीवर्य – ‘कृगोनि’ -श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.(म.रा.डि.शै.दै.रयतेचा वाली – जिल्हा प्रतिनिधी)
मु. पो. ता. जि. गडचिरोली.
व्हा. नं. ९४२३७१४८८३.
email – nikodekrishnakumar@gmail.com

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED