लोकशाही टिकवण्याचे काम काॅग्रेसजनांना करावे लागेल- जिल्हाध्यक्ष मा आ. राहुल बोंद्रे

24

🔹बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काॅग्रेस पक्ष स्थापना दिन

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.29डिसेंबर):- २८ डिसेंबर १८८५ रोजी गोकुलदास देशपाल सांस्कृतिक भवन मुंबई या ठिकाणी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. आज त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रांगणात जिल्हा अध्यक्ष मा आ राहुल भाउ बोंद्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी पंचायत राज संघटन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मणिषा ताई पवार, खामगाव विधानसभा पक्षनेते ज्ञानेश्वर दादा पाटील, जळगाव जामोद विधानसभा पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर , जिल्हा युवक काॅग्रेस चे अध्यक्ष मनोज कायंदे , बुलढाणा पंचायत समिती सभापती सौ उषाताई चाटे, विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश खेडकर आदी उपस्थित होते.

सुरवातीला वंदे मातरम गीत नंतर ध्वजारोहण करण्यात आले नंतर राष्ट्रगीत गाउन काँग्रेस पक्षाच्या ध्वजाला सलामी देण्यात आली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी संबोधन करतांना काँग्रेस पक्षाच्या इतिहासावर संबोधन केले.
इंग्रजाना मदत करणारे जे मनुवादी होते तेच देशामधे राज्य करता आहेत त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात आहे त्यामुळे लोकशाही टिकवण्याचे काम काॅग्रेस जनांना करावे लागेल. पुढे ते म्हणाले की स्वातंत्र्य लढ्यात तसेच या देशाच्या जडणघडणीत व निर्मिती मधे काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे देशातील विविध धर्म, पंथ व जाती मधे ऐक्य निर्माण करुन मजबूत राष्ट्राची निर्मीती केली तसेच या देशाच्या एकता व एकात्मता साठी इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले म्हणून काॅग्रेस चा इतिहास दैदिप्यमान पाहायला मिळतो.

स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, भगतसिंग अशा महान विभूतींनी ब्रिटिश साम्राज्यशाहीला ममवून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हे आपण विसरून चालणार नाही म्हणून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांने ही विचारधारा जनमानसात रूजवून काँग्रेस चा विचार सदोदित जिवंत ठेवावा अशा प्रकारचे आवाहन या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.