मेकअप करायच ना…मग या टिप्स चा उपयोग करा

40

मेकअप करायला प्रत्येक मुलीला आवडतं. पण मेकअप करणं ही एक कला आहे आणि आवश्यक नाही की प्रत्येक जण या कलेत पारंगत असेलच. मेकअप हे खूप मोठं क्षेत्र आहे. मेकअप करण्यापासून ते मेकअपमधील बारकावे आणि मेकअप करताना होणाऱ्या चुकाही ह्यात सामील आहेत.काही जणी घरून निघताना अगदी पूर्ण मेकअप करूनच बाहेर पडतात तर काही मुली काजळ आणि लिपस्टीक लावून रेडी होतात. प्रत्येकीची मेकअप करण्याची आवड आणि परिभाषा वेगळी आहे. काहींना मेकअप करायला आवडत तर असतं पण मेकअप करता येत नाही. कारण त्यांना मेकअप टीप्सची माहिती नसते.

सगळ्यात आधी पाहूया मेकअपसाठी वापरण्यात येणारे मेकअप प्रोडक्ट्सबद्दल. हे सर्व मेकअप प्रोडक्ट्स तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाइन अगदी सहज मिळतील. मेकअप करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते योग्य मेकअप प्रोडक्ट्स निवडणं. फक्त टीव्हीवरील जाहिराती पाहून किंवा मॉलमधील सेल्समनचं ऐकून कोणतंही प्रोडक्ट घेऊ नका. लॅक्मे, मेबलीन न्यूयॉर्क, लॉरियल आणि कलरबार असे कितीतरी ब्रॅंड्स आहेत जे स्कीन टोनप्रमाणे मेकअप प्रोडक्ट्सची रेंज बाजारात आणतात. तुम्हाला फक्त तुमच्या आवडीप्रमाणे स्कीनला सूट होईल असा मेकअप निवडायचा आहे. चांगला मेकअप करण्यासाठी तुमच्याकडे काही चांगले मेकअप प्रोडक्ट्स असणं महत्वाचं आहे.
फाउंडेशन (Foundation)

मेकअप करताना फाउंडेशन फेसवर सगळ्यात आधी लावण्यात येत. म्हणजेच फाउंडेशन हा तुमच्या मेकअपचा बेस असतो. भारतीय स्कीनटोन साधारणतः नॉर्मल, ड्राय, ऑयली, मिक्स, डार्क आणि लाइट अशा असतात. फाउंडेशनची शेड ही स्कीनटोन्स लक्षात घेऊन बनवल्या जातात. त्यामुळे सर्वात आधी फाउंडेशनची शेड निवडताना तुमच्या चेहऱ्याशी कोणती शेड ब्लेंड होईल ते पाहून घ्या. योग्य टोनचं फाउंडेशन खरेदी करताना सर्वात आधी आपल्या अंगठ्यावर किंवा हातावर थोडं फाउंडेशन लावून बघा. फाउंडेशन तुम्ही गालांवर देखील लावून बघू शकता की ती शेड तुमच्या स्कीनशी मॅच होते की नाही.

कंसीलर (Concealer)
कंसीलरचा वापर चेहऱ्यावरील डाग, व्रण आणि बरेच वेळा लाल चट्टे लपवण्यासाठी केला जातो. ह्याचा उपयोग तुम्ही डोळ्याखालील डार्क सर्कल्स लपवण्यासाठी ही करू शकता. कंसीलरच्या वापराने चेहऱ्यावरील पिंपल्ससुध्दा दिसत नाहीत. जर तुमच्या चेहऱ्याचा रंग साफ असेल तर कंसीलर वापरताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, ते तुमच्या स्कीनटोनशी मॅच होणारं असलं पाहिजे. जर तुमच्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स असतील तर हे जास्त महत्वाचं आहे.

आयलायनर (Eyeliner)

डोळ्यांच्या सौंदर्याला अजूनच खुलवतं ते म्हणजे आयलायनर. हे वेगवेगळ्या स्टाइल्सनी लावता येत असल्याने तुम्ही प्रत्येकवेळी आपल्या डोळ्यांना नवा लूक देऊ शकता. ह्यासाठी तुम्ही लिक्वीड किंवा पेन्सील आयलायनरचा वापर करू शकता. तसं तर सर्वात जास्त ब्लॅक आयलायनरचा वापर केला जातो. पण तुम्ही नेहमीपेक्षा हटके ब्लू, डार्क ग्रीन किंवा इतर ही कलर आयलायनरचा वापर करून नवा लूक ट्राय करू शकता.
मस्कारा (Mascara)

डोळ्यांचे सौंदर्य घनदाट आणि लांबसडक पापण्यांनी खुलून येते. पापण्या जर पातळ आणि लहान असतील तर तुम्ही मस्काराच्या मदतीने त्या दाट आणि सुंदर करू शकता. यासाठी तुम्हाला मस्कारा कसा लावायचा हे जाणून घ्यावं लागेल. ज्यामुळे तुमच्या पापण्या अधिकच सुंदर दिसू लागतील.

आयशॅडो (Eyeshadow)

डोळे उठावदार दिसण्यासाठी आयशॅडोचा वापर केला जातो. त्वचेच्या रंगसंगतीप्रमाणे आयशॅडोची शेड निवडायला हवी. जर तुम्ही सावळ्या असाल तर गोल्ड, कॉपर, मॅक्स ब्राऊन, ब्रॉंझ, मॅक्स बर्गंडी यासारख्या शेड्स वापरा. जर तुम्ही गोऱ्या असाल तर रेड, ब्लू, ग्रीन, पिंक, पर्पल, गोल्ड असे कलर डोळ्यांवर फार सुंदर दिसतात.
लिपस्टीक (Lipstick)

लिपस्टीक एक असं प्रोडक्ट आहे जे प्रत्येक मुलीच्या मेकअप बॉक्समध्ये असतंच असतं. लिपस्टीक ही तुमच्या लुक कंप्लीट तर करतेच पण कधी कधी चांगल्या लुकला बिघडवू ही शकते. याच कारणामुळे लिपस्टीकची खरेदी खूप विचारपूर्वक करावी. जर तुम्ही पहिल्यांदा लिपस्टीक खरेदी करायला जाणार असाल तर तुम्ही सगळ्या शेड्स ट्राय करू पाहू शकता. प्रत्येक शेड तुमच्या हातावर लावून बघा. ह्यासाठी तुम्ही शॉपकीपरची मदत पण घेऊ शकता. जर तुमचा रंग सावळा असेल तर रेड, मरून, ब्राऊनसारख्या थोड्या डार्क शेड्स तुम्हाला चांगल्या दिसतील. जर तुम्ही गोऱ्या आहात तर सॉफ्ट पिंक, ऑरेंज आणि निऑन कलर्ससुध्दा चांगले अॉप्शन आहेत.
गोल फेसशेप (Round Face)

गोल चेहरा जेवढा दिसायला सुंदर असतो तेवढाच मोठा ही वाटतो. गोल आकाराच्या चेहऱ्यासाठी डोळ्यांचा मेकअप जास्त प्रभावी असला पाहिजे. त्याबरोबरच गोल चेहऱ्याला स्लिम लूक देणारा मेकअप करायला हवा. गोल चेहऱ्याला स्लिम लूक देण्यात महत्वाची भूमिका कॉन्ट्यूरिंगची असते. चेहऱ्यावर फाउंडेशन किंवा कंसीलरच्या मदतीने कॉन्ट्यूरिंग केलं जातं. गोल फेसशेप असलेल्या मुलींनी डोळ्यांलर बोल्ड आयलायनर किंवा डार्क आयशॅडो लावलं पाहिजे. ब्लश लावताना गालांवर तिरके स्ट्रोक्स लावावे. ज्यामुळे तुमचे चीकबोन्स जास्त उठून दिसणार नाहीत आणि स्लीम वाटतील.

✒️लेखिका:-वसुमती देसाई(मेकअप आर्टिस्ट,कोल्हापूर)